संतोष कानडे
आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या मुंग्या साधारण १० कोटी वर्षांहून अधिक काळ पृथ्वीवर आहेत.
डायनासोरच्या काळातही मुंग्या होत्या, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. या मुंग्यांचेही प्रकारही नाना आहेत.
जगभरात अंदाजे २० क्वाड्रिलियन मुंग्या (२०,००,००,००,००,००,००,००,०००) आहेत. म्हणजे २० लाख कोटी इतक्या.
जगात ८ अब्ज लोक धरले तर प्रत्येक व्यक्तीमागे साधारण 25 लाख मुंग्या असतील.
पृथ्वीवरील जवळपास सर्व खंडांवर मुंग्या आहेत. अंटार्क्टिका सोडलं तर सगळीकडे त्यांचं वास्तव्य आहे.
मुंग्यांमध्ये राणी मुंगी हे विशेष आकर्षण असतं. राणी मुंगी साधारण १५–२० वर्षे जगते.
राणी मुंगीचं मुख्य काम म्हणजे अंडी घालणं, हेच आहे. कामकरी मुंग्यांचे आयुष्य मात्र काही महिनेच असते.
सैनिक मुंग्या दातासारख्या मजबूत जबड्यांनी शत्रूंवर हल्ला करतात. काही मुंग्यांमध्ये दंश करून विष सोडण्याची क्षमता असते.
विशेष म्हणजे या मुंग्या पाण्यावर बुडत नाहीत. एकत्र येऊन टोळी करतात आणि लाकडांप्रमाणे पाण्यावर तरंगतात.