सकाळ डिजिटल टीम
हुडेड पिटोहुई (Hooded Pitohui) हा एक विषारी पक्षी आहे.
हा आकाराने खूपच लहान आणि दिसायला सुंदर आहे.
हा पक्षी पापुआ न्यू गिनीमध्ये आढळतो.
आश्चर्य म्हणजे, या पक्षाला कोणी स्पर्श केला तर, त्याचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.
मात्र, पक्ष्याला स्वतःचं विष नसतं. उलट, हा पक्षी ज्या विषारी प्राण्यांची शिकार करतो, त्यांचं विष याच्या संपूर्ण शरीरात पसरतं.
या विषाला बॅट्राकोटॉक्सिन (Batrachotoxin) म्हणतात.
पक्षी चावल्यावर हे विष संपूर्ण शरीरात पसरतं. हे खूप धोकादायक विष आहे.
या पक्ष्याला स्पर्श केल्याने किंवा पकडल्याने व्यक्तीला अर्धांगवायू (Paralysis) होऊ शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.