Monika Shinde
मोदक हा गणपती पूजेतील एक आवडीचा आणि खास पदार्थ आहे. तो पारंपरिक तसेच मॉडर्न अशा दोन्ही प्रकारांमध्ये बनवला जातो.
पारंपरिक मोदक तांदळाच्या पिठापासून तयार होतो आणि त्यात गुळ व नारळाचा भरलेला सारण असतो. तो साधा पण अतिशय स्वादिष्ट असतो.
तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाच्या पिठात गोड सारण भरून तळलेले मोदक कुरकुरीत आणि टिकाऊ असते.
चॉकलेट मोदक लहान मुलं आणि तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पारंपरिक आकारात चॉकलेटची चव हा परफेक्ट कॉम्बो आहे.
काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे सारण भरलेले मोदक हेल्दी, एनर्जेटिक आणि फेस्टिव्हल स्पेशल म्हणून आवडले जातात.
आजकाल फिटनेस प्रेमींकरिता साखरविरहित, गूळ-नारळ, खजूर किंवा स्टेव्हियासारख्या पर्यायांनी बनवलेले मोदक उपलब्ध आहेत.
तुम्हाला पारंपरिक गोडसर मोदक आवडतो का, की काहीतरी नवीन आणि वेगळा मॉडर्न मोदक? तुमचा फेव्हरेट कोणता आहे?
दोन्ही प्रकारचे मोदक गणपतीच्या पूजेमध्ये महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार त्यांचा आनंद घेतो.