Varsha Balhe
आज धान्य दळण्यासाठी विजेवर चालणाऱ्या चक्क्यांचा वापर केला जातो. पण पूर्वी वीज नसतानाही पाण्याच्या मदतीने धान्य दळलं जायचं. या चक्कीला पाणचक्की असं म्हणतात.
How Did Traditional Water Mills Work?
esakal
या चक्कीसाठी वाहत्या पाण्याचा वापर केला जायचा. नदी, झरा किंवा कालव्यातील पाणी एका मोठ्या चाकावर सोडलं जायचं.
How Did Traditional Water Mills Work?
esakal
पाण्याच्या जोरामुळे चक्कीचं मोठं चाक फिरायचं. या चाकाला जोडलेल्या यंत्रामुळे आतील दगडी चक्कीही फिरू लागायची.
How Did Traditional Water Mills Work?
esakal
या चक्कीत वरच्या बाजूने धान्य टाकलं जायचं. फिरणाऱ्या दोन दगडांमध्ये हे धान्य दळलं जाऊन त्याचं पीठ तयार व्हायचं.
How Did Traditional Water Mills Work?
esakal
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे प्रसिद्ध पानचक्की आहे. तिथे पाण्याच्या मदतीने चक्की चालवण्याची जुनी पद्धत पाहायला मिळते.
How Did Traditional Water Mills Work?
esakal
हिमालयातील काही भागांमध्ये आजही पाण्यावर चालणाऱ्या चक्क्या पाहायला मिळतात. या चक्क्यांना 'घराट' असं म्हणतात.
How Did Traditional Water Mills Work?
esakal
या चक्कीसाठी विजेची किंवा इंधनाची गरज नव्हती. वाहत्या पाण्याच्या मदतीनेच धान्य दळलं जायचं. त्यामुळे ही पद्धत त्या काळात खूप उपयोगी होती.
How Did Traditional Water Mills Work?
esakal
Why Has the Water Level in Krishna River Dropped?
esakal