राजघराणे! एकेकाळी हजार हत्तींचा ताफा, आज फक्त वन बीएचके

संतोष कानडे

राजघराणी

भारतात आज अशी राजघराणी आहेत, ज्यांच्याकडे एकेकाळी हजारो हत्ती आणि तिजोरीमध्ये जगातली अफाट संपत्ती होती.

वन बीएचके

पण आज या लोकांचे हाल बघवणार नाहीत, असे आहेत. कुणी वन बीएचकेमध्ये राहतंय तर कुणाकडे तेवढाही निवारा नाही.

लखनऊ

लखनऊच्या नवाबांची वंशज असल्याचं सांगणाऱ्या राजकुमारी विलायक महल आणि त्यांची मुलं अत्यंत हालाखीत जगले.

राजकुमारी

१९७०-८०च्या दशकामध्ये राजकुमारींनी नवी दिल्लीतल्या रेल्वे स्टेशनच्या व्हिप वेटिंग रुममध्ये अनेक वर्षे काढली होती.

मालचा महल

पुढे सरकारने त्यांना राहण्यासाठी एक 'मालचा महल' नावाचा एक पडका किल्ला दिला होता. तिथे पाणीही नव्हतं अन् वीजही नव्हती. त्यांचा मृत्यू अत्यंत हालाखीत झाला.

बाहदूरशाह जफर

मुघलांचा शेवटचा सम्राट बाहदूरशाह जफर याची आणि त्याच्या वंशजाची अवस्था तर फारच बिकट झालेली.

मोहम्मद बेदर बख्त

बाहदूरशाह जफर याचा पणतू मिर्झा मोहम्मद बेदर बख्त याची पत्नी सुल्ताना बेगम ही दोन खोल्यांच्या घरात राहाते.

सुलताना बेगम

सुलताना बेगमने उपजीविकेसाठी अनेक कामं केली. अगदी स्टेशनबाहेर खाद्यपदार्थदेखील तिने विक्री केली.

वेतन

१९७१ मध्ये इंदिरा गांधी सरकारने राजघराण्यांना मिळणारे वेतन बंद केले होते, राजघराण्यांचं अंतर्गत वाद उफाळून आल्याने संपत्ती कोर्टात अडकली आणि जे काळाप्रमाणे बदलले नाही ते मात्र संपले.

उन्हाळ्यात फिरायला जावं, अशी थंड हवेची ठिकाणं

<strong>येथे क्लिक करा</strong>