फिरायला जात असाल, तर प्रवासात अशा प्रकारे घ्या काळजी!

Monika Shinde

प्रवास

प्रवास उत्साहदायक असतो, पण योग्य काळजी न घेतल्यास त्रासदायक ठरू शकतो. ही ६ सोपी टिप्स तुमचा प्रवास सुरक्षित, आनंददायी आणि आरामदायक करतील.

पॅकिंगमध्ये अतिरेक टाळा

प्रवासासाठी प्रत्येक दिवसासाठी कपडे ठरवा. 'जरुरीपेक्षा जास्त' सामान घेणं टाळा. हलकं बॅग आणि स्मार्ट पॅकिंग हेच खऱ्या प्रवासाचं शास्त्र आहे.

महत्त्वाची कागदपत्रं साठवून ठेवा

ओळखपत्र, बुकिंग प्रिंट्स, तिकीट, वैद्यकीय माहिती यांची छायाप्रत व डिजिटल कॉपी दोन्ही ठेवा. अनपेक्षित परिस्थितीत हे उपयोगी ठरतं.

प्राथमिक औषधपेटी सोबत ठेवा

सर्दी, अपचन, डोकेदुखी, फर्स्ट एडसाठी आवश्यक औषधे बरोबर असू द्या. प्रवासात आरोग्यदृष्ट्या सतर्क राहणं गरजेचं आहे.

फोन पूर्ण चार्ज ठेवा

प्रवासात संपर्क महत्त्वाचा असतो. फोन, पॉवर बँक आणि चार्जर हमखास घ्या. नकाशा, माहिती, बुकिंग यासाठी फोन महत्त्वाचा असतो.

वेळेचं नियोजन ठरवा

अनावश्यक गडबड टाळण्यासाठी ट्रिपचं वेळापत्रक आधीच ठरवा. विशेषतः स्थानिक वाहतूक, हॉटेल चेक-इन आणि पर्यटक स्थळांची माहिती ठेवा.

थोडे रोख पैसे ठेवा

डिजिटल व्यवहार सुरक्षित आणि ट्रॅक करण्याजोगे असतात. पण इंटरनेट नसल्यास रोख पैशांचीही गरज पडू शकते.

‘स्मार्ट शॉपर’ व्हायचंय? मग हे आर्थिक मंत्र नक्की वाचा!

येथे क्लिक करा