संतोष कानडे
इ.स. १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला होता.
या तहानुसार शिवाजी महाराजांना स्वराज्यातील २३ किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले होते.
त्या २३ किल्ल्यांमध्ये लोहगड किल्ल्याचाही समावेश होता. तहानंतर लोहगड काही काळ मुघलांच्या ताब्यात गेला होता.
पुरंदरचा हा तह स्वराज्य वाचवण्यासाठी आणि पुढील संघर्षासाठी वेळ मिळवण्यासाठी करण्यात आल्याचे इतिहासकार मानतात.
तहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा भेट स्वीकारली, मात्र तेथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.
आग्र्यातून सुटका करून परतल्यानंतर महाराजांनी पुन्हा स्वराज्य विस्ताराची मोहीम सुरू केली.
इ.स. १६७० मध्ये महाराजांनी अनेक गड पुन्हा जिंकले आणि लोहगडही स्वराज्यात परत आला.
लोहगडचे स्थान भोर घाटावरील व्यापारमार्गाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे होते.
त्यामुळे पुरंदरच्या तहात गमावलेला आणि नंतर पुन्हा जिंकलेला लोहगड हा स्वराज्याच्या लष्करी इतिहासातील महत्त्वाचा किल्ला मानला जातो.