मुंबई-पुण्याजवळचा हा गड नक्की बघा! सीतेच्या वनवासाशी जोडलेलं आहे नातं

Aarti Badade

हिवाळी सहलीसाठी उत्तम ठिकाण

जर तुम्ही हिवाळ्यात मुंबई किंवा पुण्याजवळ 'वन-डे ट्रिप' प्लॅन करत असाल, तर निसर्गसौंदर्याने नटलेला आजोबा गड हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

Ajoba Fort Trek

|

Sakal

सह्याद्रीतील उंच शिखर

आजोबा गड हा सह्याद्रीतील सर्वात उंच पर्वतांपैकी एक असून येथून निसर्गाचा मनमोहक नजारा आणि विहंगम दृश्य पाहायला मिळते.

Ajoba Fort Trek

|

Sakal

पौराणिक वारसा

असे मानले जाते की, वनवासात असताना माता सीता याच पर्वतावर वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली होती आणि येथेच लव-कुशचा जन्म झाला होता.

Ajoba Fort Trek

|

Sakal

कुठे आहे हा गड?

हा गड माळशेज घाट परिसरातील शहापूर तालुक्यात स्थित असून निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हे एक आवडीचे ठिकाण आहे.

Ajoba Fort Trek

|

Sakal

ट्रेकिंगचा थरार

आजोबा गड ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असून वाटेत लागणारे घनदाट जंगल, छोटे धबधबे आणि पक्ष्यांचा किलबिलाट मनाला शांती देतो.

Ajoba Fort Trek

|

Sakal

गिर्यारोहकांसाठी आव्हान

या गडावर ३००० फुटांची एक उभी रॉक वॉल (कडा) आहे, जी रॉक क्लायंबिंग करणाऱ्या साहसी गिर्यारोहकांसाठी मोठे आव्हान मानले जाते.

Ajoba Fort Trek

|

Sakal

बालाघाट रांगेचा मानबिंदू

रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मध्ये बालाघाट रांगेत वसलेला हा गिरीदुर्ग चहूबाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेला आहे.

Ajoba Fort Trek

|

Sakal

सीता गुहा आणि आश्रम

गडाच्या पायथ्याशी वाल्मिकी ऋषींचा आश्रम आणि वर सीता गुहा असून येथे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक शांततेचा अनुभव येतो.

Ajoba Fort Trek

|

Sakal

12व्या शतकातील शौर्याचा वारसा! ‘सोनार किल्ला’ नावामागचं रहस्य जाणून घ्या

Jaisalmer Golden sonar Fort

|

Sakal

येथे क्लिक करा