सकाळ डिजिटल टीम
ट्रेकिंग करताना शरीरातून भरपूर घाम येतो आणि त्यातून सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे क्षार (Electrolytes) बाहेर पडतात. मीठ हे सोडियमचा मुख्य स्रोत असल्याने त्याचा योग्य प्रमाणात वापर शरीरातील क्षारांची पूर्तता करतो.
पाणी आणि मीठ यांचा योग्य समतोल ठेवल्यास डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. फक्त पाणी पिल्यास क्षारांचा अभाव होऊन कमजोरी जाणवू शकते.
शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमची कमतरता झाल्यास मांसपेशींना आकडी (cramps) येतात. थोडेसे मीठ खाल्ल्याने किंवा लिंबूपाण्यात मिसळून प्याल्याने हे टाळता येते.
मीठामुळे मेंदू व स्नायूंना आवश्यक सिग्नल मिळतात आणि त्यामुळे थकवा कमी जाणवतो.
ट्रेकिंग करताना उंचावर किंवा थकवा आल्यास अनेकांना चक्कर, मळमळणे, उलट्या होणे यासारख्या समस्या होतात. मीठ यावेळी उपयोगी ठरते.
लिंबूपाण्यात चिमूटभर मीठ मिसळून प्या.
साखर व मीठ यांचे मिश्रण (ORS पावडर) सोबत ठेवा.
अन्नासोबत मीठ खा, पण अति प्रमाणात टाळा.
उच्च रक्तदाब (BP) असलेल्या व्यक्तींनी मीठ नियंत्रित प्रमाणातच घ्यावे.
अतिप्रमाणात मीठ घेतल्यास पाणी धरून ठेवण्याची शक्यता असते.
ट्रेकिंग करताना मीठ हे छोटं पण अत्यंत महत्त्वाचं आहे. ते शरीरातील क्षारांची पूर्तता करतं, डिहायड्रेशन टाळतं आणि तुमची ऊर्जा टिकवून ठेवतं.