विद्यार्थ्यांसाठी 2026 मधील प्रीमियम आणि ट्रेंडिंग कोर्सेस कोणते?

Monika Shinde

करिअर

आजच्या काळात करिअर खूप महत्वाचं झालं आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज जीवनापासूनच अनेक नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

उच्च शिक्षणासोबत कौशल्य

आता प्रत्येक कंपन्यांना उच्च शिक्षणासोबत वेगवेगळी कौशल्य असलेले उमेदवार हवे असतात. चला तर जाणून घेऊया २०२६ मध्ये ट्रेंडिंग कोर्सेस कोणते जे तुम्ही शिकू शकतात.

डेटा सायन्स आणि अ‍ॅनालिटिक्स

डेटा विश्लेषण, प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग आणि मशीन लर्निंग शिकवणारे कोर्सेस विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. डेटा-ड्रिव्हन निर्णय घेण्यासाठी कंपन्यांना डेटा सायंटिस्ट्सची गरज आहे.

सायबर सिक्युरिटी

सायबर हल्ल्यांपासून संरक्षण आणि नेटवर्क सुरक्षिततेसाठी प्रशिक्षित तज्ज्ञांची मागणी वाढली आहे. यामुळे सायबर सिक्युरिटी कोर्स भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग

AI आणि ML तंत्रज्ञानामुळे ऑटोमेशन, स्मार्ट असिस्टंट्स आणि उद्योगांमध्ये नवकल्पना येत आहेत. या क्षेत्रातील कोर्सेस विद्यार्थ्यांसाठी आकर्षक आहेत.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कोडिंग

सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची मागणी डिजिटलायझेशनमुळे झपाट्याने वाढली आहे. योग्य कौशल्ये जसे की कोडिंग, वेब व मोबाइल डेव्हलपमेंट आत्मसात केल्यास उच्च वेतन आणि करिअर संधी मिळतात.

चार्टर्ड अकाउंटंट (CA)

कॉर्पोरेट फायनान्स, कर नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापन शिकवणारे कोर्सेस विद्यार्थीांसाठी स्थिर करिअरची संधी देतात. सीए व्यावसायिकांना उच्च दर्जाची नोकरी मिळते.

UX/UI डिझाइन

डिजिटल उत्पादनांचा वापर वाढल्यामुळे UX/UI डिझायनर ची मागणी वाढली आहे. प्रॉडक्ट डिझाइन, युजर अनुभव आणि इंटरफेस डिझाइन या कौशल्यांनी विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह आणि टेक्निकल क्षेत्रात संधी मिळते.

क्लाउड कंप्युटिंग आणि DevOps

क्लाउड तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन टूल्समध्ये स्किल्ड व्यावसायिक मोठ्या प्रमाणात हवे आहेत. AWS, Azure, Google Cloud सारखे प्लेटफॉर्म्स शिकल्याने उच्च वेतन आणि करिअर संधी मिळतात.

डिजिटल मार्केटिंग

ऑनलाइन व्यवसाय वाढत असल्यामुळे SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग सारख्या कौशल्यांची मागणी वाढली आहे. ब्रॅंड बिल्डिंग आणि मार्केटिंग तज्ज्ञांना कंपन्या प्राधान्य देतात.

भारतामधील 7 लपलेली ठिकाणे जी तुम्ही कधीच ऐकलेली नाहीत...

येथे क्लिक करा