सकाळ वृत्तसेवा
टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी बीजेडी नेते पिनाकी मिश्रा यांच्यासोबत जर्मनीत लग्न केलं. एक फोटोही व्हायरल होत आहे, पण दोघांनीही अजून अधिकृत घोषणा केलेली नाही.
भारतीय नागरिक जर्मनीत लग्न करू शकतात, पण त्यासाठी काही विशेष प्रक्रिया आणि कागदपत्रांची गरज लागते.
भारतीयांना जर्मनीत लग्न करण्यासाठी "मॅरेज व्हिसा" आवश्यक असतो. यासाठी पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र, सिंगल स्टेटस सर्टिफिकेट आणि काही वेळा भारत सरकारचा NOC आवश्यक असतो.
२०२४ मध्ये एका सरासरी जर्मन लग्नाचा खर्च १५,४५२.५० युरो, म्हणजेच जवळपास १४ लाख रुपये.
जर्मनीत लग्न हा एक भव्य सोहळा असतो. यामध्ये केटरिंग, फोटोग्राफी, संगीत, ड्रेस, सजावट, आमंत्रणं यासाठी भरपूर खर्च होतो.
सर्वात जास्त खर्च होतो जेवणावर – ७८०३.५० युरो म्हणजे सुमारे ७.१ लाख रुपये.
संगीत: १३५७.२५ युरो (१.२५ लाख)
फोटोग्राफी: १६६७ युरो (१.५ लाख)
वेडिंग ड्रेस: १३५८ युरो (१.२ लाख)
सजावट: ७४०.५० युरो (६८,०००)
आमंत्रण कार्ड व स्टेशनरी: ३०३ युरो (२७,०००)
जर्मनीतील ८ पैकी १ कपल फक्त ५००० युरोपेक्षा कमी खर्च करतात. पण प्रत्येक ५० कपल्समध्ये १ कपल असे असते जे ४०,००० युरो (३६ लाख रुपये) पेक्षा जास्त खर्च करतात.