बाळकृष्ण मधाळे
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही विविध अफवा रंगताना दिसत आहेत.
Trisha Krishnan Net Worth
esakal
थलपती विजय याच्याशी तिची खास मैत्री असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. मात्र, या नात्याबाबत दोघांकडूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Trisha Krishnan Net Worth
esakal
४ मे रोजी, जेव्हा विजयने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, त्याच दिवशी तिचा वाढदिवसही होता. या खास प्रसंगी त्रिशा त्याच्या घरी झालेल्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले.
Trisha Krishnan Net Worth
esakal
मीडिया रिपोर्टनुसार, त्रिशा कृष्णनची एकूण संपत्ती सुमारे ८५ कोटी इतकी आहे. तिने आपल्या करिअरमध्ये सातत्याने प्रगती करत आलिशान जीवनशैली उभारली आहे.
Trisha Krishnan Net Worth
esakal
तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये मजबूत स्थान निर्माण केलेल्या त्रिशाला मोठे मानधन मिळते. विशेषतः पोन्नियिन सेल्वन या चित्रपटाच्या यशानंतर तिची मागणी अधिक वाढली आहे.
Trisha Krishnan Net Worth
esakal
तसेच लिओ या चित्रपटात विजयसोबत काम करताना तिने अंदाजे ५ कोटी मानधन घेतल्याचे सांगितले जाते. याशिवाय, ती ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रमोशनमधून दरवर्षी सुमारे ९ कोटींची कमाई करते.
Trisha Krishnan Net Worth
esakal
त्रिशाचे चेन्नई येथे एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे १० ते १२ कोटी असल्याचे सांगितले जाते. तसेच हैदराबाद येथेही तिची मालमत्ता असून तिची किंमत अंदाजे ६ ते ७ कोटी आहे.
Trisha Krishnan Net Worth
esakal
गाड्यांच्या बाबतीतही त्रिशाची आवड खास आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, बीएमडब्ल्यू ५ सिरीज, रेंज रोव्हर इव्होक आणि मर्सिडीज-बेंझ ई-क्लास यांसारख्या प्रीमियम गाड्यांचा समावेश आहे.
Trisha Krishnan Net Worth
esakal
त्रिशा कृष्णन नुकतीच 'ठग लाईफ' या चित्रपटात कमल हासन आणि सिंबारसन टीआर यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसली होती. मणिरत्नम दिग्दर्शित या गँगस्टर ॲक्शन ड्रामामध्ये ऐश्वर्या लक्ष्मी, अभिरामी, अशोक सेल्वन, जोजू जॉर्ज, नासर आणि महेश मांजरेकर यांच्याही भूमिका होत्या.
Trisha Krishnan Net Worth
esakal
आगामी काळात ती आरजे बालाजी दिग्दर्शित ‘करुप्पू’ या चित्रपटात सूर्यासोबत दिसणार आहे. हा फँटसी ॲक्शन चित्रपट १४ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Trisha Krishnan Net Worth
esakal
Maharashtra Tourism
esakal