Anushka Tapshalkar
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या बॅटिंगसह फिटनेससाठीही ओळखला जातो. वर्ल्ड कप 2023 साठी त्याने खास फिटनेस रूटीन तयार केले होते.
रोहित शर्मा आपल्या वॉर्मअपमध्ये योग आणि स्ट्रेचिंगचा समावेश करतो. यामुळे शरीर लवचिक राहते आणि दुखापतींचा धोका कमी होतो.
गेल्या काही वर्षांत रोहितच्या फिटनेसमध्ये मोठा बदल झाला आहे. तो रनिंग, सायकलिंग आणि हाय-इंटेन्सिटी वर्कआउट करून स्टॅमिना वाढवतो.
बॉलला जोरदार फटका मारण्यासाठी आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी तो नियमितपणे वेट ट्रेनिंग करतो.
रोहित कमी कॅलरीयुक्त, प्रथिनयुक्त आहार घेतो. त्याच्या आहारात अंडी, चिकन, फळे, भाज्या आणि हेल्दी फॅट्स असतात.
तो भरपूर पाणी पितो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक्स घेतो.
योग्य विश्रांती मिळावी यासाठी तो ७-८ तास झोपतो आणि मसाज, आइस बाथसारख्या तंत्रांचा वापर करतो.
तो फिटनेससोबत मानसिक संतुलन जपण्यासाठी ध्यान आणि मेडिटेशन करतो. त्यामुळे मैदानावर चपळ आणि सतर्क राहतो.
या शिस्तबद्ध फिटनेस रूटीनमुळेच रोहित शर्माने वर्ल्ड कप 2023 मध्ये चमकदार खेळ केला.