Monika Shinde
कधी कधी मानदुखी त्रासदायक ठरते आणि हळूहळू ती आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम करू लागते. मात्र, काळजीचं काही कारण नाही.
मानदुखी कमी करण्यासाठी काही सोपी आणि प्रभावी योगासने आहेत, जी तुम्ही सहजपणे घरबसल्या करू शकता. चला, जाणून घेऊया ही उपयुक्त आसने
काठासन हे पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढवणारे एक प्रभावी योगासन आहे. विशेषतः मानदुखीसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त ठरते.
जमिनीवर बसून दोन्ही पाय सरळ पुढे पसरवा. नंतर हळूहळू शरीर पुढे झुकवा आणि शक्य असेल तितकं पायांच्या अंगठ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हे एक साधं, पण आरामदायक योगासन आहे.
वज्रासन हे एक अतिशय सोपं आणि प्रभावी योगासन आहे. पाय गुंडाळून शांतपणे बसल्याने मानदुखी आणि पाठीच्या त्रासांपासून आराम मिळतो.
मान दुखी कमी करण्यासाठी शारीरिक व मानसिक शांती महत्त्वाची आहे.आरामदायक ठिकाणी शांतपणे बसा. ५-१० मिनिटं ध्यान करा. ध्यान हा एक उत्तम उपाय आहे.