Aarti Badade
पुणे केवळ शिक्षणाचे केंद्र नाही, तर खाद्यसंस्कृतीसाठीही ओळखले जाते. जाणून घेऊया इथे जन्मलेले भन्नाट पदार्थ
पुण्यात उगम पावलेला एक लोकप्रिय चाट प्रकार! गोल पुरीत बटाटा, कांदा, दही, तिखट-गोड चटण्या आणि भरपूर शेव!
ब्रिटिश काळात बनण्यास सुरुवात झाली, पण पुण्यात विशेष प्रसिद्धी मिळवली. कयानी बेकरी आणि सिटी बेकरीची श्रूजबरी बिस्किट्स आजही फेमस
खराडीतून सुरू झालेला तंदूरी चहा आज देशभरात लोकप्रिय झाला आहे. गरम मातीच्या कुल्हडमध्ये ओतलेला चहा आणि त्याचा स्मोकी स्वाद
तीन ब्रेडच्या स्लाईसमध्ये बटर, हिरवी चटणी, काकडी, टोमॅटो, उकडलेला बटाटा, चाट मसाला आणि भरपूर चीज! श्रीकृष्ण क्लासिक क्लबचे खास गिफ्ट
घट्ट दुधाचा शेक आणि त्यावर मोठा आईस्क्रीमचा गोळा! "मस्त आहे!" या उद्गारातूनच या पेयाला 'मस्तानी' हे नाव मिळालं.
पुण्याचा खाद्य वारसा! या पदार्थांमुळे पुणे केवळ खवय्यांसाठीच नव्हे, तर इतरांनाही खाद्यसंस्कृतीची प्रेरणा देणारे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.