Aarti Badade
मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल एकत्र करून मऊ पीठ मळा. १० मिनिटे झाकून ठेवा.
बटाटे उकळा, सालं काढा व किसा. त्यात तळलेला कांदा, मसाले, मीठ आणि कोथिंबीर घालून स्टफिंग तयार करा.
मळलेली कणिक छोटे भाग करून पातळ चपात्या लाटून घ्या.
गरम तव्यावर सर्व चपात्या दोन्ही बाजूंनी थोड्याफार अर्धवट भाजून घ्या.
चपातीवर सॉस लावा, एक बाजूस स्टफिंग ठेवा आणि त्यावर चीज ठेवा. दुसरी बाजू दाबून बंद करा.
नॉनस्टिक पॅनमध्ये बटर टाकून टॅको दोन्ही बाजूंनी मंद आचेवर कुरकुरीत भाजा.
तयार झालेल्या टॅकोज गरमागरम सॉससह सर्व्ह करा आणि घरच्या घरी बनवलेल्या मेक्सिकन स्वादाचा आनंद घ्या!