Aarti Badade
हिवाळ्यात गाजर भरपूर मिळतात. नेहमीचा हलवा करण्यापेक्षा यंदा अमरावतीच्या गृहिणी सुनिता घुलक्षे यांनी सांगितलेली गाजराची बर्फी नक्की बनवून पाहा.
Carrot Barfi Recipe
Sakal
किसलेले गाजर, संत्र्याचे काप (पर्यायी), साखर, खवा (मावा), विलायची पूड, फूड कलर (आवडीनुसार) आणि बटर पेपर.
Carrot Barfi Recipe
Sakal
सर्वात आधी पॅनमध्ये संत्र्याचे काप टाकून ते थोडे मॅश करा. संत्र्यामुळे बर्फीला एक वेगळीच आंबट-गोड आणि फ्रेश चव येते.
Carrot Barfi Recipe
Sakal
संत्र्यामध्ये साखर टाकून ती पूर्ण विरघळू द्या. त्यानंतर त्यात गाजराचा किस घालून हे मिश्रण चांगले शिजवून घ्या.
Carrot Barfi Recipe
Sakal
मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात खवा (Mawa) मिक्स करा. खव्यामुळे बर्फीला हॉटेलसारखा रिचनेस आणि मऊपणा मिळतो.
Carrot Barfi Recipe
Sakal
खवा घातल्यानंतर ५-१० मिनिटे परता. शेवटी विलायची पूड टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. आता बर्फीचे सारण तयार आहे.
Carrot Barfi Recipe
Sakal
हे सारण बटर पेपरवर काढून पसरवून घ्या. अर्धा तास थंड होऊ द्या. वड्या कापताना त्या थोड्या ओलसर ठेवा, जेणेकरून त्या नरम राहतील.
Carrot Barfi Recipe
Sakal
कमी साखर वापरून घरच्या घरी तयार झालेली ही गाजर बर्फी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. नक्की करून पाहा!
Carrot Barfi Recipe
Sakal
Mysterious Brihadeeswarar Temple
sakal