Aarti Badade
संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या बैलजोडीसाठी आप्पाचीवाडी (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील बैलजोडीची निवड!
बाबूराव अर्जुन खोत यांच्या बैलजोडीस मिळाला तुकोबांच्या पालखीचा मान – गावासाठी आणि पंचक्रोशीसाठी अभिमानाचा क्षण.
संत तुकाराम महाराज देहू संस्थानने यंदा खास बैलजोडी खरेदीचा निर्णय घेतला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून अनेक जोड्यांची पाहणी करण्यात आली.
खोत कुटुंबीयांची बैलजोडी उत्कृष्ट गुणवत्ता, आरोग्य व शिस्तीत असल्याने निवड झाली.
१२ जून रोजी बैलजोडीची गावातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
प्रदक्षिणेनंतर बैलजोडीची पूजन करून ओवाळणी करण्यात आली – गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सन्मानाने बैलजोडीची सेवा करून गावकऱ्यांनी आपली भक्ती व प्रेम व्यक्त केले.
या गौरवक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली – क्षण अविस्मरणीय!
बैलजोडीच्या माध्यमातून ग्रामीण मेहनत, निष्ठा आणि श्रद्धेचे दर्शन घडले.