नेपाळच्या राजघराण्याची कुलदैवत आहे महाराष्ट्राची तुळजाभवानी...

Shubham Banubakode

तुळजापूरची तुळजाभवानी

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर हे शक्तिपीठ आहे. ही देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनीही आहे.

Tulja Bhavani and Nepal Royal Family Connection

|

esakal

नेपाळशी ऐतिहासिक नाते

आश्चर्याची बाब म्हणजे हीच तुळजाभवानी नेपाळच्या राजघराण्याचीही कुलदैवता आहे. या मागे एक मोठा इतिहास आहे.

Tulja Bhavani and Nepal Royal Family Connection

|

esakal

कर्नाटकी घराण्याचा नेपाळ प्रवास

कर्नाटकी घराण्याचे हरीसिंह हे बिहारच्या चंपारण्यचे राजा होते. त्यांच्या देवघरात तुळजाभवानीची मूर्ती होती. एका युद्धातील पराभवानंतर हरीसिंह नेपाळला पळाले सोबत तुळजाभवानीची मूर्ती घेऊन गेले.

Tulja Bhavani and Nepal Royal Family Connection

|

esakal

नेपाळच्या मल्ल राजांचे योगदान

नेपाळमध्ये मल्ल राजांचे राज्य होते. त्यांनी आपल्या मुलीचे लग्न हरीसिंह यांचा मुलगा जयपालसिंग याच्याशी लावून दिले. नंतर हरीसिंह नेपाळचे नरेश बनले.

Tulja Bhavani and Nepal Royal Family Connection

|

esakal

नेपाळमध्ये तुळजाभवानीची स्थापना

नेपाळमधील मल्ल राजांनी भक्तपूर, काठमांडू आणि पाटण अशा तीन ठिकणी तुळजाभवनी स्थापन केली. तसेच मंदिरंही बांधली.

Tulja Bhavani and Nepal Royal Family Connection

|

esakal

नेवारी स्थापत्य शैलीतील मंदिरे

ही मंदिरं नेवारी स्थापत्य शैलीत असून नेपाळी भाषेत तुळजाभवानीला ‘देगू तलेजूभवानी’ असं म्हणतात.

Tulja Bhavani and Nepal Royal Family Connection

|

esakal

सेवेकरी

तुळजापूर येथे तुळजाभवानीच्या सेवेकऱ्यांना ‘सोळा सेवेकरी’ म्हणतात, तर नेपाळमध्ये त्यांना ‘सोलकास्ट’ म्हणतात.

Tulja Bhavani and Nepal Royal Family Connection

|

esakal

नेपाळच्या राजेशाहीचा वारसा

नेपाळची राजेशाही संपुष्टात आली असली, तरी तुळजाभवानी ही तिथल्या राजघराण्याची कुलदेवता आहे. तिथे आजही तुळजाभवानीची पुजा केली जाते.

Tulja Bhavani and Nepal Royal Family Connection

|

esakal

पांढराशुभ्र चंद्र जेव्हा लाल होतो; पाहा 'ब्लड मून'चे फोटो

Blood Moon hd Photo

|

esakal

हेही वाचा-