Pranali Kodre
स्वयंपाक घरातील 'किचन किंग' म्हणून ज्या गोष्टीला स्थान आहे, ती म्हणजे हळद.
Turmeric benefits
Sakal
हळदीचा वापर भारतात तर घराघरात विविध कार्यांमध्ये होतो, कधी पदार्थांना स्वाद आणण्यासाठी, कधी सौंदर्यासाठी, तर कधी औषधासाठी.
Turmeric benefits
Sakal
हळदीचे अनेक उपयोगही आहेत. हळद + चंदन + मुलतानी माती दुधात मिसळून चेहऱ्यावर लेप लावल्यास त्वचा नितळ, उजळ व तजेलदार होते.
Turmeric benefits
Sakal
रात्री पाव चमचा हळद गरम पाण्यात घेतल्याने सूज कमी होण्यात मदत होते, तसेच शरीरातील हानिकारक तत्त्वे कमी होतात व पेशी ताज्यातवान्या होतात.
Turmeric benefits
Sakal
हळदीमध्ये ब आणि क ही जीवनसत्व असतात. याचसोबत कर्क्युमिन, लोह, कॅल्शिअम, झिंक, मॅंगनीज व तंतुमय पदार्थ असतात.
Turmeric benefits
Sakal
हळद पाणी, दूध, मध किंवा तुपाबरोबर घेतल्यास मांसपेशीतील ताण कमी होतो व सांधे मोकळे होतात.
Turmeric benefits
Sakal
अगदी अनेक पिढ्यांपासून जखमेवर हळदीची पट्टी लावली जाते. हळद ही जंतूसंसर्गाशी लढते आणि जखमही भरुन काढण्यास मदत करते.
Turmeric benefits
Sakal
पाव चमचा हळद रोज सकाळी गरम पाण्यासोबत घेतल्यास आजार बरे होण्यास मदत होते आणि प्रतिकारशक्तीही वाढते.
Turmeric benefits
Sakal
हळद ही औषधासारखीच आहे. ती जर योग्य प्रमाणात वापरली, तर ती अमुल्य आहे, पण जर अतिसेवन केलं, तर त्याच हळदीचा त्रासही होऊ शकतो.
Turmeric benefits
Sakal
Bhagyashree Mote Fitness Secrets