Aarti Badade
झाडांची सुपीकता वाढवण्यासाठी आणि रासायनिक खतांपासून बचाव करण्यासाठी घरगुती सेंद्रिय खत सर्वोत्तम पर्याय आहे.
बाजारात मिळणाऱ्या खतांमध्ये रसायने असतात, जी तुमच्या आरोग्याला आणि भाज्यांच्या गुणवत्तेला धोका देऊ शकतात.
घरातील भाज्यांच्या साली, चहाची पावडर, अंड्याचे कवच अशा सहज उपलब्ध गोष्टींपासून तुम्ही खत तयार करू शकता.
एक बॉक्स, स्वयंपाकघरातील कचरा, सुकी पाने, थोडी माती आणि पाणी – एवढंच लागेल.
बॉक्सच्या तळाशी सुकी पाने ठेवून त्यावर कचरा व मातीचा थर द्या. हे थर एकामागोमाग एक रचत जा.
दर ३–४ दिवसांनी मिश्रण ढवळा, जेणेकरून ऑक्सिजन मिळेल आणि बॅक्टेरिया सक्रिय राहतील.
शिजवलेले अन्न, हाडे, प्लास्टिक किंवा तेल टाकू नका. कंपोस्ट खराब होईल आणि वास येऊ शकतो.
घरच्या घरी खत बनवून तुम्ही झाडांना पोषण देता आणि पर्यावरणालाही मदत करता.