सकाळ डिजिटल टीम
कासवाच्या गोष्टी प्रमाणे त्याचा वेग खरच संथ आहे का जाणून घ्या त्याच्या वेगाबद्दल अधिक माहिती
tortoise
sakal
बहुतेक जमिनीवरील कासवांचा (Tortoises) सरासरी वेग साधारणपणे ०.२ ते ०.५ किमी प्रति तास इतका असतो. म्हणजे एका मिनिटात ते साधारण ३ ते ५ मीटर अंतर कापू शकतात.
tortoise
sakal
जमिनीवर संथ वाटणारे कासव पाण्यात मात्र कमालीचे वेगवान असते. समुद्री कासव (Sea Turtles) पाण्यात ३० ते ३५ किमी प्रति तास वेगाने पोहू शकतात.
tortoise
sakal
'गॅलापागोस' (Galapagos) जातीचे महाकाय कासव हे सर्वात संथ चालणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. त्यांचा वेग ताशी केवळ ०.३ किमी इतका असतो.
tortoise
sakal
'लेदरबॅक' (Leatherback) हे जगातील सर्वात वेगवान समुद्री कासव मानले जाते. पोहताना त्यांचा वेग ताशी ३५ किमी पर्यंत पोहोचू शकतो, जो मानवी पोहण्याच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.
tortoise
sakal
कासवाच्या संथ गतीचे मुख्य कारण त्यांचे जड हाडांचे कवच असते. हे कवच त्यांच्या शरीराचाच भाग असल्याने त्यांना त्याचे वजन सोबत घेऊन चालावे लागते, ज्यामुळे त्यांचा वेग मर्यादित होतो.
tortoise
sakal
कासव मुळात संथ चालतात कारण त्यांना आपली ऊर्जा वाचवायची असते. त्यांचा 'मेटाबॉलिजम' (Metabolic rate) खूप कमी असतो, ज्यामुळे ते अन्नाशिवाय अनेक दिवस जगू शकतात.
tortoise
sakal
जरी वेग कमी असला, तरी समुद्री कासव केवळ पोहत हजारो मैलांचा प्रवास करतात. एका वर्षात ते साधारण १५,००० ते २०,००० किलोमीटर अंतर पार करू शकतात.
tortoise
sakal
कासवांना वेगाने धावता येत नाही, म्हणूनच निसर्गाने त्यांना संरक्षणासाठी वेग देण्याऐवजी 'कठोर कवच' दिले आहे. संकटाच्या वेळी पळण्यापेक्षा ते स्वतःला कवचात ओढून घेणे पसंत करतात.
tortoise
sakal
Raccoon
sakal