Varsha Balhe
युरोपमधील बार्ले गावातून बेल्जियम आणि नेदरलँड्स या दोन देशांची सीमा जाते. विशेष म्हणजे ही सीमा रस्ते, दुकानं आणि घरांमधूनही जाते.
Two Countries in One House
esakal
या गावातील काही घरं चक्क दोन देशांत विभागली गेली आहेत. घराचा एक भाग बेल्जियममध्ये, तर दुसरा भाग नेदरलँड्समध्ये आहे.
Two Countries in One House
esakal
घराचा मुख्य दरवाजा ज्या देशाच्या हद्दीत येतो, त्या देशाच्या नियमांनुसार त्या घराचा पत्ता ठरवला जातो.
Two Countries in One House
esakal
सीमा घरातून जात असल्यामुळे काही घरांना दोन्ही देशांचे स्वतंत्र पत्ते आणि दोन डोरबेलही आहेत.
Two Countries in One House
esakal
गावातील रस्ते आणि दुकानांजवळ जमिनीवर पांढऱ्या रंगाच्या खुणांनी सीमा दाखवली आहे. त्यावर बेल्जियमसाठी 'B' आणि नेदरलँड्ससाठी 'NL' लिहिलेलं असतं.
Two Countries in One House
esakal
या गावातील डच भागाला बार्ले नासाऊ, तर बेल्जियमच्या भागाला बार्ले-हेरटॉग म्हटलं जातं.
Two Countries in One House
esakal
या गावात सीमा सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी वळणं घेत घरं आणि इमारतींमधून जाते. त्यामुळे एकाच गावात दोन देशांचा अनुभव घेता येतो.
Two Countries in One House
esakal
ही अनोखी सीमा पाहण्यासाठी पर्यटक बार्ले गावाला भेट देतात. काही ठिकाणी एकाच जागी उभं राहून दोन देशांत असल्याचा अनुभव घेता येतो.
Two Countries in One House
esakal
Japan Gate Tower Building
esakal