भौगोलिक आश्चर्य! दोन समुद्र, एक दृश्य! भारतातील हे ठिकाण पाहिलंय का तुम्ही?

Aarti Badade

भारताची किनारपट्टी

भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. अनेक राज्यांना लांब किनारपट्टी लाभली आहे, पण दोन्ही समुद्र असतील, असं एकच ठिकाण आहे.

Sakal

पुद्दुचेरीची ओळख

तो केंद्रशासित प्रदेश म्हणजे पुद्दुचेरी (Puducherry), जो पूर्वी पाँडिचेरी म्हणून ओळखला जात होता. त्याला दोन-दोन समुद्रकिनारे लाभले आहेत.

Sakal

अद्वितीय भौगोलिक स्थिती

पुद्दुचेरीची भौगोलिक स्थिती खरोखरच अद्वितीय आहे. त्याचे चार स्वतंत्र जिल्हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये विखुरलेले आहेत.

Sakal

दोन समुद्रांची किनारपट्टी

या विभाजनामुळेच पुद्दुचेरीला पूर्व (बंगालचा उपसागर) आणि पश्चिम (अरबी समुद्र) दोन्ही समुद्रांवर किनारपट्टी मिळाली आहे.

Sakal

बंगालच्या उपसागरावरील जिल्हे

पुद्दुचेरी, कराईकल आणि यानम हे जिल्हे बंगालच्या उपसागराच्या (Bay of Bengal) काठावर आहेत. येथे फ्रेंचकालीन वास्तुकला आणि सुवर्ण किनारे प्रसिद्ध आहेत.

Sakal

अरबी समुद्रावरील जिल्हा

चौथा जिल्हा माहे (Mahe) हा केरळ राज्यात अरबी समुद्राच्या (Arabian Sea) काठावर वसलेला आहे. माहे शांत किनारे आणि हिरवळीसाठी ओळखला जातो.

Sakal

पर्यटकांचे आकर्षण

प्रोमेनेड बीच (बंगालचा उपसागर) आणि माहेचे शांत किनारे (अरबी समुद्र)—या दुहेरी किनारपट्टीच्या अनुभवाने पुद्दुचेरी पर्यटकांना मोठे आकर्षण ठरते.

Sakal

पुण्याचे प्राचीन वैभव! ८व्या शतकातील पाताळेश्वर गुंफा मंदिराचा अद्भुत इतिहास

Pataleshwar Cave Temple Pune History

|

Sakal

येथे क्लिक करा