Shubham Banubakode
पूराच्या किंवा साचलेल्या पाण्यात वाहन अडकलं असेल आणि इंजिनमध्ये पाणी शिरलं असेल, तर कोणत्याही परिस्थितीत वाहन सुरू करण्याचा प्रयत्न करू नका.
Two-Wheeler Insurance Claim
esakal
पाणी शिरलेल्या इंजिनला स्टार्ट केल्यास ‘हायड्रोस्टॅटिक लॉक’ होण्याचा धोका वाढतो आणि इंजिनच्या आतील महत्त्वाचे भाग गंभीरपणे खराब होऊ शकतात.
Two-Wheeler Insurance Claim
esakal
इंजिनमध्ये पाणी असतानाही चावी फिरवणे किंवा सेल्फ मारणे ही निष्काळजीपणाची कृती मानली जाऊ शकते आणि त्याचा फटका इन्शुरन्स क्लेम करताना बसू शकतो.
Two-Wheeler Insurance Claim
esakal
विमा कंपन्या पुरामुळे झालेले नैसर्गिक नुकसान स्वीकारतात. मात्र वाहन सुरू करून नुकसान वाढवल्यास इन्शुरन्स क्लेम नाकारला जाऊ शकतो.
Two-Wheeler Insurance Claim
esakal
अशा वेळी वाहन सुरू करण्याऐवजी ते ढकलून सुरक्षित ठिकाणी न्यावे किंवा टोईंग व्हॅनच्या मदतीने बाहेर काढावे.
Two-Wheeler Insurance Claim
esakal
वाहन सुरक्षित ठिकाणी पोहोचताच घटनेची माहिती तातडीने विमा कंपनी आणि अधिकृत गॅरेजला देणे महत्त्वाचे ठरते.
Two-Wheeler Insurance Claim
esakal
वाहनाला ‘इंजिन प्रोटेक्शन ॲड-ऑन’ कव्हर असेल, तर इंजिनच्या नुकसानीसाठी खर्च मिळण्यास मदत होऊ शकते.
Two-Wheeler Insurance Claim
esakal
पावसाळ्यात थोडी घाई किंवा एक चुकीचा निर्णय महागात पडू शकतो. त्यामुळे पाणी शिरल्याचा संशय असेल, तर वाहन सुरू करणे टाळा.
Two-Wheeler Insurance Claim
esakal
-benefits-of-eating-pineapple-daily
esakal