Aarti Badade
हा एक दुर्मिळ अनुवांशिक मधुमेहाचा प्रकार आहे, ज्याला MODY (Maturity Onset Diabetes of the Young) म्हणतात.
यात इम्यून सिस्टमचा सहभाग नसतो (जसा टाइप-१ मध्ये असतो), आणि लठ्ठपणा वा इन्सुलिन रेसिस्टन्स टाइप-२ प्रमाणे नसतो.
मुख्य कारण म्हणजे जनुकातील उत्परिवर्तन. पालकांकडून मुलांमध्ये ऑटोसोमल डोमिनंट पद्धतीने हे जनुक येते.
वारंवार लघवी होणे,अधिक तहान लागणे,थकवा,कारण नसताना वजन कमी होणे,कुटुंबात आधी कोणाला मधुमेह असणे.
अनुवांशिक चाचणी, जेनेटिक मधुमेहाची तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो.
काही उपप्रकारांसाठी औषधाची गरज नसते,कमी डोसमध्ये तोंडी औषधं (Sulfonylureas),फारच कमी वेळा इन्सुलिनची गरज
प्रतिबंध शक्य नाही, पण लवकर निदान आणि जीवनशैली सुधारणा केल्यास गुंतागुंत टाळता येते.
किशोरावस्था किंवा लवकर प्रौढ वयात याची सुरुवात होते.
प्रत्येक उपप्रकार विशिष्ट जनुकातील बदलांमुळे होतो. त्यामुळे उपचार वेगळे असतात.
टाइप-५ मधुमेहाचे निदान चुकीचे होऊ शकते. म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक आहे.
टाइप-५ मधुमेह हा अनुवांशिक असून वेळीच निदान केल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.