Ankur Nikam
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला बैलगाडा शर्यतींची मोठी परंपरा आहे. गावच्या जत्रा, यात्रा आणि उत्सवांमध्ये या शर्यतींचे आयोजन केले जाते. मात्र भागानुसार शर्यतीची पद्धत वेगळी आहे.
Bullock Cart Race Maharashtra
esakal
या प्रकारात बैलजोड्या पारंपरिक गाडीला जुंपवून धावतात. काही ठिकाणी दोन जोड्या एकाच गाडीला जुंपल्या जातात. ठरावीक अंतर कमी वेळेत पूर्ण करण्याची स्पर्धा असते.
Bullock Cart Race Maharashtra
esakal
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि सोलापूर पट्ट्यात छकडी शर्यती प्रसिद्ध आहेत. या प्रकारात एका बैलजोडीला हलकी आणि लहान छकडी जुंपली जाते. वेग आणि समन्वयाला महत्त्व असते.
Bullock Cart Race Maharashtra
esakal
हा प्रकार विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत लोकप्रिय असलेला प्रकार आहे. या शर्यतीत एका वेळी एका बैलजोडीला धावण्याची संधी दिली जाते. ठरावीक अंतर कमी वेळेत पार करणार विजेता असतो.
Bullock Cart Race Maharashtra
esakal
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज परिसरात हा प्रकार पाहायला मिळतो. पाण्याने आणि चिखलाने भरलेल्या भातशेतीत बैल धावतात. इथल्या जमिनीचा पोत आणि शर्यतीचे स्वरूप यामुळे या प्रकाराला वेगळी ओळख मिळाली आहे.
Bullock Cart Race Maharashtra
esakal
कोल्हापूर जिल्ह्यातीलच इचलकरंजी परिसरात हा शर्यतीचा प्रकार प्रसिद्ध आहे. यात बैलांना गाडीऐवजी जड लाकडी ओंडका ओढावा लागतो. ओंडका ओढत ठरावीक अंतर कमी वेळेत पूर्ण करणे हे आव्हान असते.
Bullock Cart Race Maharashtra
esakal
सांगली जिल्ह्यातील या प्रकारात बैलजोडीला साधारण ५०० मीटर अंतर धावून ठरलेल्या ठिकाणी वळायचे असते आणि पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परतायचे असते. त्यामुळे वेगासोबत वळण घेण्याचे कौशल्यही महत्त्वाचे ठरते.
Bullock Cart Race Maharashtra
esakal
कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. अरत-परतच्या पद्धतीशी साधर्म्य असलेल्या या प्रकारात वाळूच्या जमिनीवर बैलांची धाव पाहायला मिळते.
Bullock Cart Race Maharashtra
esakal
महाराष्ट्रातील प्रत्येक भागाने बैलगाडा शर्यतींना स्वतःची वेगळी ओळख दिली आहे. या शर्यती केवळ स्पर्धा नसून ग्रामीण जीवन, परंपरा आणि स्थानिक उत्सवांचा भाग आहेत.
Bullock Cart Race Maharashtra
esakal
Shankar Maharaj History
esakal