Anushka Tapshalkar
इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे ठराविक वेळ अन्न सेवन करून उर्वरित वेळ उपवास ठेवण्याची पद्धत. ही पद्धत काय खावे यापेक्षा कधी खावे यावर भर देते.
या डाएटमध्ये 16 तास उपवास करून 8 तासांच्या आत अन्नाचे सेवन करायचे असते. नाश्ता न करता दुपारचे जेवण हे दिवसाचे पहिले जेवण म्हणून करायचे असते.
पाच दिवस सामान्यपणे खाऊन नंतरचे सलग दोन दिवस कॅलरीचे सेवन मर्यादित ठेवणे, साधारणतः (500-600 किलोकॅलरी) इतके.
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा 24 तास उपवास करायचा असतो. 12 तासांच्या उपवासाने सुरवात करत हळूहळू वेळ वाढवता येते.
दर एक दिवसाआड उपवास करणे किंवा उपवासाच्या दिवशी खूप कमी कॅलरी खाणे. सुमारे 500 किलो कॅलरी.
20 तास उपवास करून फक्त रात्रीचे जेवण मोठ्या प्रमाणात करणे. उपवासाचा कालावधी हळूहळू वाढवत सुरुवात करा. एकदम सुरुवातीला 20 तास उपवास केल्याने आरोग्यासाठी ढोक उद्भवू शकतो.
इंटरमिटंट फास्टिंग प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. तुम्हाला काही वैद्यकीय समस्या असतील किंवा तुम्ही गरोदर / स्तनपान करत असाल, तर सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.