Udayanraje Bhosale : साताऱ्यात उदयनराजेंचा हटके अंदाज! काॅलर उडवत 'मै हू डॉन'वर धरला ठेका, लोक बघतच राहिले...

बाळकृष्ण मधाळे

'रक्षक प्रतिष्ठान'च्या लोकगीताचे लाॅंचिंग

खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुशील मोझर यांच्या रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नव्या लोकगीताचे भव्य लाॅंचिंग नुकतेच साताऱ्यातील ऐतिहासिक जलमंदिर येथे पार पडले.

Udayanraje Bhosale Satara

|

esakal

अल्पावधीतच गीत लोकप्रिय

विशेष म्हणजे, या लोकगीताचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध संगीतकार व गायक अवधूत गुप्ते यांनी केले असून, अल्पावधीतच हे गीत समाजात लोकप्रिय ठरत आहे.

Udayanraje Bhosale Satara

|

esakal

उदयनराजेंच्या हस्ते लाॅंचिंग

या लोकगीताचे औपचारिक लाॅंचिंग खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udayanraje Bhosale Satara

|

esakal

'रक्षक प्रतिष्ठान'च्या गीतात सामाजिक एकात्मता

साताऱ्याच्या समाजकारणात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या रक्षक प्रतिष्ठानच्या या लोकगीतामध्ये सामाजिक एकात्मता, कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि लोकभावना प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

Udayanraje Bhosale Satara

|

esakal

अवधूत गुप्तेंनी केलं स्वरबद्ध गीत

अवधूत गुप्ते यांनी स्वरबद्ध केलेल्या या गीताने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

Udayanraje Bhosale Satara

|

esakal

उदयनराजेंचा झटके अंदाज

कार्यक्रमादरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांचा नेहमीचा उत्साही आणि झटके अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

Udayanraje Bhosale Satara

|

esakal

'मै हू डॉन'वर धरला ठेका

“मै हू डॉन” या लोकप्रिय गाण्यावर उदयनराजेंनी शर्टाची कॉलर उडवत ठेका धरला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये जल्लोष निर्माण झाला. त्यांच्या या सहज, दिलखुलास शैलीने कार्यक्रमात रंगत आणली.

Udayanraje Bhosale Satara

|

esakal

सामाजिक कार्याला नवी ऊर्जा

या लोकगीताच्या माध्यमातून रक्षक प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

(सर्व फोटो : प्रमोद इंगळे, सातारा)

Udayanraje Bhosale Satara

|

esakal

उदयनराजेंच्या कॉलर उडविण्याच्या स्टाईलवर तरुणाई एकदम फिदा; पाहा कधी न पाहिलेले Photo

Udayanraje Bhosale | esakal
येथे क्लिक करा...