Monika Shinde
UDID म्हणजे युनिक डिसॅबिलिटी आयडी. दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने सुरू केलेले ओळखपत्र असून सर्व सरकारी योजनांसाठी हे कार्ड महत्त्वाचे आहे.
सरकारी योजना, पेन्शन, आरोग्य सेवा आणि अनुदानाचा लाभ घेण्यासाठी UDID कार्ड अनिवार्य आहे. एकाच कार्डावर सर्व सुविधा मिळतात.
किमान 40 टक्के दिव्यांगत्व असलेली कोणतीही व्यक्ती UDID कार्डसाठी अर्ज करू शकते. वैध दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर आणि पत्ता पुरावा आवश्यक असतो.
भारत सरकारच्या स्वावलंबन (UDID) पोर्टलवर जाऊन UDID कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. वेबसाइट मोबाईलवरही उपलब्ध आहे.
पोर्टलवर नोंदणी करा, आवश्यक माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा. अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा.
अर्जानंतर संबंधित शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी होते. तपासणीनंतर UDID कार्ड मंजूर केले जाते.