पावसाळ्यात नखांची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

पावसाळ्यात नखांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण पावसाळ्यात अनेक आजार, संसर्ग होऊ शकतात. त्यामुळे नखं साफ असणे गरजेचे आहेत.

पावसाळ्यात नखांची काळजी कशी घ्याल? यासाठी कोणते घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात? चला तर मग जाणून घेऊयात

या ऋतूत नखं जास्त लांब ठेवू नयेत. लांब नखांमध्ये बॅक्टेरिया फार लवकर वाढू लागतात. यामुळे संसर्गाचा धोका दुपटीने वाढतो.

त्यामुळे पावसाळ्यात नखं लहान ठेवा. खूप लांब नखं हे देखील नखं लवकर तुटण्याचे कारण आहे.

खराब नखं साफ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर खूप उपयुक्त ठरू शकतो.

अशा परिस्थितीत तुम्ही गरम पाण्यात व्हिटॅमिन ई तेल टाका आणि नंतर त्या मिश्रणात तुमचे नखे 5 ते 10 मिनिटे बुडवा. असे केल्याने नखांच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

खराब नखं स्वच्छ करण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी आणि शॅम्पू देखील वापरू शकता. अशावेळी कोमट पाण्यात शॅम्पू, गुलाबपाणी आणि थोडेसे मीठ घाला.

आता तयार पाण्यात नखे बुडवा. आता हलक्या हातांनी स्वच्छ करा. असे केल्याने नखे सहज स्वच्छ करता येतात.

लिंबाचा रस तुमची नखे स्वच्छ करण्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकतो. पण काही लोकांना असे वाटते की लिंबाचा रस तुमची नखे पिवळी करू शकतो, परंतु तसे नाही.

लिंबाचा रस आणि लिंबाची साल वापरून तुम्ही नखे स्वच्छ करू शकता. हे लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुमचे नखे स्वच्छ कराल तेव्हा मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. असे केल्याने नखे तर स्वच्छ दिसतीलच शिवाय चमकदारही होतील.

खोबरेल तेल वापरा

या ऋतूत नखांना निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेल हा उत्तम घरगुती उपाय आहे.

खोबरेल तेलामध्ये अनेक गुणधर्म आहेत आणि हे सर्व गुणधर्म केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहेत. या तेलाचा वापर नखांना निरोगी ठेवण्यासाठीही करता येतो.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

milk tea | sakal
येथे क्लिक करा