Varsha Balhe
उंबर हंडी ही मराठवाडा आणि खान्देश भागातील पारंपरिक डिश आहे. याला मोदक भाजी असेही म्हणतात. झणझणीत रस्सा आणि मसालेदार मोदक हे या भाजीचे वैशिष्ट्य आहे.
UMBAR HANDI RECIPE IN MARATHI
esakal
मोदक बनवण्यासाठी बेसन आणि गव्हाचे पीठ एकत्र घ्या. त्यात हळद, लाल तिखट, मीठ आणि थोडे तेल घालून पाणी टाकत घट्ट पीठ मळून घ्या.
UMBAR HANDI RECIPE IN MARATHI
esakal
सारणासाठी सुके खोबरे, खसखस, भाजलेले शेंगदाणे, आले, लसूण आणि कोथिंबीर घ्या. त्यात धणे-जिरेपूड, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला घालून मिश्रण तयार करा.
UMBAR HANDI RECIPE IN MARATHI
esakal
मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळ्यात थोडे सारण भरून त्याला मोदकाचा आकार द्या. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या.
UMBAR HANDI RECIPE IN MARATHI
esakal
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. त्यात कांदा-खोबऱ्याचे वाटण आणि आले-लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्या.
UMBAR HANDI RECIPE IN MARATHI
esakal
आता त्यात हळद, लाल तिखट, धणेपूड, काळा मसाला आणि मीठ घाला. मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून रस्स्याला उकळी आणा.
UMBAR HANDI RECIPE IN MARATHI
esakal
तयार केलेले मोदक उकळत्या रस्स्यामध्ये सोडा. मंद आचेवर मोदक चांगले शिजू द्या. मोदक शिजल्यावर रस्स्याला छान घट्टपणा येतो.
UMBAR HANDI RECIPE IN MARATHI
esakal
तयार झाली तुमची झणझणीत उंबर हंडी! गरमागरम मोदक भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खायला अतिशय चविष्ट लागते.
UMBAR HANDI RECIPE IN MARATHI
esakal
BENEFITS OF DRINKING WATER IN THE MORNING
esakal