Apurva Kulkarni
जगभरात स्त्री -पुरुष समानतेते अधिकार दिले आहेत. अजूनही काही ठिकाणी महिला समानतेसाठी लढा देत आहेत.
परंतु एका गावात महिलांचं राज्य आहे. तसंच त्या गावात पुरुषांना 'नो एन्ट्री' आहे.
उत्तरी केनियामधील सॅंबुरू काउंटीमध्ये "उमोजा" नावाचे एक गाव आहे, जिथे फक्त महिला राहतात. हे गाव बऱ्यापैकी आदिवासी वस्तीसारखे दिसते.
या गावात आणि अन्य गावामध्ये फरक हाच आहे की, या गावात एकही पुरुष नाहीये. तसंच पुरुषांना या गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
उमोजा गावात जास्त करुन महिला राहतात. या महिलांनी हिंसा आणि गैरवर्तनाचा सामना केलेला आहे. तसंच त्यांच्या परिवाराने त्यांना सोडून दिलं आहे.
या गावात अशा महिला राहतात ज्या बालविवाह किंवा खतना यांसारख्या प्रथांपासून वाचून पळून आलेल्या असतात. या गावात सुमारे ५० कुटुंबे राहतात.
तरीही या गावातील रहिवाशांची संख्या कमी-जास्त होत राहते. हे गाव महिलांच्या हक्कांबद्दल आणि लिंगावर आधारित हिंसेबाबत आपल्या रहिवाशांना जागरूक करतं.
या गावातील महिलांच्या मुलांना 18 वर्षापर्यंत गावात राहण्याची परवानगी आहे. या गावात राहणाऱ्या महिला संबुरू संस्कृतिच्या आहेत.