Anushka Tapshalkar
रॅमसर साइट असलेल्या सांभर सरोवरात स्थलांतरित पक्ष्यांची संख्या १५ पट वाढली आहे.
एशियन वॉटरफोल सेन्ससनुसार, जानेवारी 2025 मध्ये १,०४,९९३ पक्षी नोंदवले गेले, तर 2024 मध्ये ही संख्या फक्त ७,१४७ होती.
या वर्षी ३७ प्रजातींचे पक्षी सांभर सरोवरात नोंदवले गेले आहेत, मागील वर्षी केवळ २३ प्रजाती होत्या.
यामध्ये सर्वाधिक ७८,००० लेसर फ्लेमिंगो आढळले, ज्यामुळे हे ठिकाण पक्षी निरीक्षकांचे आकर्षण ठरत आहे.
१८,१८० ग्रेटर फ्लेमिंगो या ठिकाणी नोंदले गेले आहेत – हा ही एक महत्त्वाचा संकेत आहे.
नॉर्दन शोव्हेलर्स (४,४३६), ग्रीन-विंग्ड टील्स (१,४५७), आणि लिटिल स्टिंट्स (७६४) देखील पाहायला मिळाले.
या वाढीचं प्रमुख कारण म्हणजे यंदा चांगला पाऊस आणि सरोवरात टिकून राहिलेलं पाणी.
प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक अबिद अली खान यांच्या नेतृत्वाखाली ही मोजणी झाली. त्यांनी पर्यावरणीय परिस्थिती अनुकूल असल्याचं सांगितलं.
ही वाढ ही पर्यावरणप्रेमींसाठी आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आशेची किरण आहे.