IPL 2027: धोनीच्या खेळण्यावर सस्पेन्स! CSK कोणाला रिलीज करणार?

Pranali Kodre

सलग तिसऱ्यांदा प्लेऑफ गाठण्यात अपयश

५ वेळचा चॅम्पियन संघ आणि कोट्यवधी चाहत्यांची जान, पण सलग तिसऱ्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं तिकीट हुकलं आहे.

CSK Probable releases IPL 2027

|

Sakal

खेळाडूंच्या दुखापतींचा फटका

आयपीएल २०२६ चा हंगाम CSK साठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला. त्यांना सर्वात मोठा फटका बसला तो प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींचा.

CSK Probable releases IPL 2027

|

Sakal

वेगवान गोलंदाजांना दुखापत

एमएस धोनी, आयुष म्हात्रेसह त्यांचे हुकमी एक्के असलेले वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर पडले.

CSK Probable releases IPL 2027

|

Sakal

ऋतुराज गायकवाडचे अपयश

त्यातच, गेल्या ५ सिजनपासून CSKच्या फलंदाजीचा कणा राहिलेला कर्णधार ऋतुराज गायकवाडची बॅट यंदा पूर्णपणे शांत राहिली.

Ruturaj Gaikwad

|

Sakal

दुबेही फेल

शिवम दुबेही सपशेल फेल ठरला.

Shivam Dube

|

Sakal

संजू सॅमसनची दोन शतकं

संजू सॅमसनने दोन वादळी शतकं ठोकून एकाकी झुंज दिली खरी, पण इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली.

Sanju Samson

|

Sakal

चुका सुधारण्याची वेळ

त्यामुळे आता वेळ आलीये ती चुका सुधारण्याची आणि २० व्या सिजनच्या तयारीची.

CSK Probable releases IPL 2027

|

Sakal

धोनी खेळणार की नाही?

सर्वात आधी एमएस धोनी आगामी हंगामात खेळणार की नाही याचं उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे त्याबाबत लवकरच CSK ला निर्णय घ्यावा लागेल.

MS Dhoni

|

Sakal

प्रशांत वीर होणार रिलीज?

याशिवाय, तब्बल १४ कोटींना खरेदी केलेल्या अनकॅप्ड प्रशांत वीरला चेन्नई रिलीज करू शकते, कारण त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही.

Prashant Veer

|

Sakal

३ परदेशी खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता?

परदेशी खेळाडूंमध्ये मॅथ्यू शॉर्ट, मॅट हेन्री आणि झॅक फोक्स यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

CSK Probable releases IPL 2027

|

Sakal

खलील अहमद

एवढंच नाही, तर खलील अहमदला संघात कायम ठेवायचं की नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे.

Khaleel Ahmed

|

Sakal

मिनी-ऑक्शन

या खेळाडूंना रिलीज करून चेन्नईच्या पर्समध्ये मोठी रक्कम जमा होईल, ज्यातून ते २०२७ च्या मिनी-ऑक्शनमध्ये मॅच-विनर्स खरेदी करू शकतील.

CSK Probable releases IPL 2027

|

Sakal

जास्त फेरफार होण्याची शक्यता कमी

तसं पाहायला गेलं तर चेन्नईची फ्रँचायझी संघात फारसे फेरबदल करण्यासाठी ओळखली जात नाही, त्यामुळे या व्यतिरिक्त मोठे बदल होण्याची शक्यता कमीच आहे.

CSK Probable releases IPL 2027

|

Sakal

IPL 2027: हार्दिक पांड्याची हकालपट्टी? मुंबई इंडियन्स कोणाला रिलीज करणार?

Mumbai Indians Predicted Changes in IPL 2027

|

Sakal

येथे क्लिक करा