सकाळ डिजिटल टीम
TAN म्हणजे Tax Deduction and Collection Account Number कर कपात आणि संकलन खाते क्रमांक
ज्या संस्था किंवा व्यक्ती TDS (Tax Deducted at Source) कपात करतात, त्यांना TAN नंबर घ्यावा लागतो.
सरकारला कर कपातीची योग्य नोंद ठेवता यावी आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक राहावेत, यासाठी TAN आवश्यक असतो.
TAN कर कपात करणाऱ्यासाठी असतो.PAN (Permanent Account Number) करदात्याच्या ओळखीकरिता वापरला जातो.
TAN साठी NSDL (Protean) किंवा UTIITSL च्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येतो.
TAN नंबरशिवाय कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला TDS जमा करता येत नाही.
TAN हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो, उदा. MUMT12345L
कायदेशीरपणे कर कपात करण्यासाठी आवश्यक असतो. TDS परताव्याच्या प्रक्रियेस मदत होते व आर्थिक व्यवहार अधिक सुव्यवस्थित होतात.