सकाळ डिजिटल टीम
अर्धे डोके दुखणे (Headache) अनेक कारणांमुळे होऊ शकते. तीन प्रमुख प्रकारांमध्ये विभागले जातात. जाणून घ्या या वेदनेची कारणे आणि उपाय.
सामान्य डोकेदुखी काही वेळात कमी होते, पण अर्धे डोकेदुखी अत्यंत धोकादायक असू शकते, ज्यामध्ये डोळ्यांमध्ये अस्वस्थता आणि वेदना देखील होतात.
अर्धे डोकेदुखी होण्याची कारणे नाकाशी संबंधित संसर्ग,नीट झोप न येणे,लठ्ठपणा,मानेतील स्नायूंमध्ये ताण,चिंता आणि कष्ट,जास्त डोकेदुखीची औषधे घेणे,कॅफिनयुक्त पदार्थ,जेवण न घेणे.
तणावाच्या डोकेदुखीचे कारण थकवा, भावनिक ताण, आणि मानेच्या स्नायू किंवा सांध्यातील समस्या असू शकतात. याचे दुखणे डोक्याच्या एका भागात होते.
मायग्रेन ही तणावाच्या डोकेदुखीपेक्षा जास्त धोकादायक असू शकते. स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहे. मायग्रेनचे लक्षणे – थकवा, झोप न लागणे, आणि भावनिक ताण.
क्लस्टर डोकेदुखी हे एक अत्यंत गंभीर प्रकार आहे. ते पुरुषांमध्ये अधिक आढळते, विशेषत: धूम्रपान करणाऱ्यांमध्ये क्वचित दिसून येते.
नियमित झोपेचे पालन करा,मानसिक ताण कमी करा,संतुलित आहार आणि योग्य पाणीपिऊन हायड्रेशन,तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी ध्यान आणि विश्रांती घेणे.