सकाळ डिजिटल टीम
रेल्वेने प्रवास केला नाही, असा भारतीय सापडणे जरा विरळच आहे. भारतीय रेल्वेचं जाळं संपूर्ण देशात पसरलं आहे.
रेल्वेसंदर्भात अनेक संज्ञांचा वापर अगदी सहजपणे केला जातो. पण त्यातील तपशील सर्वांनाच ठाऊक असेल, असे नाही.
खरं तर यात प्रवाशांना फार फरक पडत नाही. पण स्थानकांच्या वर्गीकरणाची माहिती जाणून घेतली तर तीही रंजक असते.
एखाद्या स्थानकात फक्त एकाच दिशेने रेल्वे येऊ शकतात किंवा जाऊ शकतात, त्याला टर्मिनल स्टेशन म्हणतात. ज्या दिशेने रेल्वे येते, त्याच दिशेने ती परत जाते.
किमान दोन वेगळ्या दिशेने मार्ग एकत्र येतात ते स्थानक म्हणजे जंक्शन. रेल्वे गाड्यांची दिशा बदलण्यासाठी जंक्शन महत्त्वाचे असतात.
सेंट्रल स्थानक म्हणजे एखाद्या शहराचे मुख्य स्थानक. इथून त्या शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या सुरु होतात किंवा शेवटचे स्थानक असते.
अनेक स्थानकांच्या नावात कॅन्ट लावलेले असते. म्हणजेच एखाद्या शहरातील लष्कराच्या ताब्यात असलेल्या भागात असलेले स्थानक.
रेल्वे स्थानक आणि हॉल्ट स्थानक यात फरक आहे. प्रवासी वाहतूक करणारी रेल्वे जिथे क्लिअरन्ससाठी काही काळ थांबते त्याला हॉल्ट स्टेशन म्हणतात.