सकाळ वृत्तसेवा
ज्यांचं घर स्कूटर, बाईक आणि कार बनवतं, त्यांचा मुलगा मात्र कॉलेजला जातो बसने! हे ऐकून धक्का बसेल, पण ही खरी गोष्ट आहे.
राहुल बजाज हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण पूर्ण करून नुकतेच भारतात परतले होते.
त्यांना मुंबईत मुकुल उद्योग समूहात ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलं. रोज कंबाला हिल ते कुर्ला असा त्यांचा प्रवास होता.
प्रवास खूप वेळखाऊ असल्यामुळे त्यांनी वडिलांकडे कारची मागणी केली. पण वडिलांनी स्पष्ट नकार दिला.
कमलनयन बजाज — प्रसिद्ध उद्योगपती आणि खासदार. ते शिस्तप्रिय, कडक आणि साधेपणावर विश्वास ठेवणारे होते.
कार नाही, तरी स्कूटर मिळेल का? आईचं उत्तर होतं: "बसने जा!"
"आपण स्कूटर विकतो, तरी स्वतःकडे नाही?" राहुल बजाज यांना ही गोष्ट खोलवर लागली.
बराच हट्ट केल्यानंतर अखेर त्यांना स्कूटरने कामावर जाण्याची परवानगी मिळाली.
हाच साधेपणा, हाच शिस्तबद्ध दृष्टिकोन पुढे राहुल बजाज यांना कामाला आला.
बजाज उद्योग समूहाची शिस्त, मूल्यं आणि प्रामाणिकपणा राहुल बजाज यांनी स्वतः अनुभवला.