पुजा बोनकिले
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.
यंदा त्यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.
तसेच त्यांनी पर्यटन क्षेत्रासाठी खास घोषणा केल्या आहेत.
मेडिकल ट्युरिझम आणखी वाढणार
व्हिसा देण्याच्या पद्धतींमध्ये सुलभता आणणार
धार्मिक स्थळांवर पर्यटन वाढवणार
50 नवीन पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देणार
भारतात उपचार घेण्यासाठी सोप्या पद्धतीने व्हिसा देणार
पर्यटनाच्या जागी होम स्टे साठी कर सवलत देणार