पुजा बोनकिले
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.
यंदा त्यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.
महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी विशेष घोषणा केली आहे.
ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे लक्ष दिलं जाणार आहे.
यासाठी 5 लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.
एससी एसटी महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आलीय. यासाठी 5 वर्षांसाठी ही योजना असणार आहे.
एसएसी, एसटी प्रवर्गातील महिलांना या योजनेतून मदत मिळणार आहे. 5 लाख महिलांना याचा लाभ होईल. यासाठी 10 हजार कोटींचा नवा निधी दिला जाणार आहे.