Anushka Tapshalkar
टॅटू काढणे हे केवळ स्टाईलचे लक्षण नाही, तर त्याला योग्य ॲक्सेसरीने सजवल्यास तो अधिक उठून दिसतो!
हाताच्या पंज्यांवर टॅटू असल्यास, वेगवेगळ्या डिझाईनच्या अंगठ्या घालून टॅटू अधिक उठून दिसेल.
मनगटावर टॅटू असेल, तर ट्रेंडी किंवा पारंपरिक ब्रेसलेट वापरून तुमची स्टाईल वाढवा.
टॅटू दंडावर असल्यास, चांदीचं किंवा बीड्सचं आर्मलेट घालून त्याचा लुक वाढवा.
केस लहान ठेवून किंवा वर बांधून सुंदर हेअर ॲक्सेसरी वापरा आणि मानेवरील टॅटू खुलवा.
खांद्यावरील टॅटू खुलवण्यासाठी ऑफ-शोल्डर ड्रेस आणि गळ्यात नाजूक साखळ्या घालणे उत्तम पर्याय आहे.
हनुवटी किंवा गळ्यावर टॅटू असलेल्यांसाठी छोट्या-छोट्या नोजपिन्सने चेहऱ्यावर लक्ष वेधून टॅटूची शैली वाढवा.
पायावरील टॅटू उठवण्यासाठी सुंदर टो रिंग्स आणि झुलणारी अँकलेट्स (पैंजण) वापरा.
तुमची ज्वेलरी ट्रॅडिशनल असो किंवा फंकी, ती तुमच्या टॅटूला एक वेगळीच ओळख देईल.
टॅटूला योग्य ॲक्सेसरीने सजवून तुमचे फॅशन स्टेटमेंट अधिकच ग्लॅमरस बनवा!