फक्त गुलाबच नाही, तर 'ही' फुलं देऊनही तुम्ही करू शकता मुलींना हटके प्रपोज

Anushka Tapshalkar

Propose Day 2026

Valentine’s Week मधील Propose Day हा मनातलं प्रेम प्रामाणिकपणे व्यक्त करून नात्याची सुरुवात करण्याचा खास दिवस आहे. या दिवशी बरेचजण आपला जीव असलेल्या मुलीला गुलाबाची फुलं देऊन प्रेम व्यक्त करतात.

Propose Day 2026

|

sakal

इतर फुलं

पण प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त गुलाबाचीच फुलं द्यावी असं नसतं. तुम्ही इतर फुलं देऊनही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.

Proposing With Different Flowers

|

sakal

मोगरा (Jasmine)

खूपच सुवासिक फुलांपैकी मोगरा एक फूल आहे. त्यामुळे कोणताही दिखावा न करता “तू मला मनापासून आवडतेस” असं सांगण्यासाठी मोगरा योग्य फूल आहे.

Jasmine

|

sakal

सूर्यफुल (Sunflower)

सूर्यफुलाला वास नसला तरी सगळ्यांत उठून दिसणारं फूल आहे. सूर्यफुल म्हणजे उजळ, उबदार आणि एकनिष्ठ प्रेमाचं प्रतीक असून, जसं ते सूर्याच्या दिशेने वळतं तसं कायम सोबत राहण्याचं आणि नातं जपण्याचं वचन देतं.

Sunflower

|

sakal

पारिजातक

पारिजातक हे शांत, सखोल आणि देवासारखं पवित्र प्रेम दाखवतं, ज्यात गोंगाट नसतो पण मनापासून केलेली, कधी न बोललेली एकतर्फी साथ असते. त्यामुळे साध्या पद्धतीने प्रेम व्यक्त करणाऱ्यांसाठी हे फूल खास आहे.

Parijatak

|

sakal

चंपा (Champa) 

हे फूल खोल, मनाला भुरळ घालणारं प्रेम, स्वच्छ भावना आणि मनापासूनची आत्मिक जोड दर्शवतं.

Champa

|

sakal

गुलाबाशिवाय प्रपोज का करावा?

प्रेम व्यक्त करताना सगळेच गुलाब देतात. पण तुमचं वेगळेपण आणि प्रेम विशेष करण्यासाठी वेगळं फूल दिलं तर तुमचं प्रपोजल जास्त लक्षात राहतं आणि खासही वाटतं.

Why Propose with Different Flowers

|

sakal

रिलेशनशिपला नकार! काही मुली सिंगल राहण्यामागची 'ही' आहेत खरी कारणं

आणखी वाचा