Anushka Tapshalkar
दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. आणि दिवशी तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डेटवर जायचं असेल, तर पुढे दिलेल्या ठिकाणांना नक्की भेट द्या.
जर तुम्ही दोघेही आर्ट लव्हर असाल तर 'द हाय स्पिरिट्स'च्या आर्ट अटॅक इव्हेंटला नक्की जा! पण जाताना मात्र न विसरता व्हाइट टी-शर्ट घाला आणि निऑन रंग सोबत घेऊन जा.
टॅंगो हा रोमँटिक डान्स आहे, जिथे जोडीदार तालात नाचत प्रेम व्यक्त करतात. तुम्हाला पण असंच प्रेम व्यक्त करायचं आहे? मग ‘द फार्म इकोविले’चा टॅंगो सनडाउनर ट्राय करा!
जर तुम्हाला वाइनसोबत पेंटिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर 'डुलाली टॅपरूम'मधील पेंट डेटला नक्की जा.
आर्ट लव्हर्स साठी अजून एक डेट स्पॉट, तुमचा जोडीदार जर पेंटिंग्सचा आणि शिल्पकलेचा शौकीन असेल तर 'वेसावर आर्ट गॅलरी' व्हॅलेंटाईन डेटसाठी उत्तम पर्याय आहे.
जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत एखादा रोमँटिक चित्रपट पाहायचा असेल, तर 'सनसेट सिनेमा क्लब' मध्ये ओपन एअर सिनेमा डेट प्लॅन करा.
गेमिंग आवडणाऱ्या कपल्ससाठी ‘द गेम पलाशिओ’ एक उत्तम ठिकाण आहे. तिथे तुम्ही व्हिंटेज आर्केडपासून आधुनिक व्हर्च्युअल रिअॅलिटी गेम्सपर्यंत सगळ्याचा आनंद घेऊ शकता.
जर तुम्हाला काही हटके आणि अनोखं करायचं असेल, तर 'प्ले विथ निऑन' उत्तम पर्याय आहे. निऑन लाइट्सच्या झगमगाटात मजेशीर अनुभव घ्या.
ऍडव्हेंचरस कपल्ससाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. या व्हॅलेन्टाईन्स डेला तुम्हाला जर काही थ्रिलिंग अनुभव घ्याचा असेल तर मिस्ट्री रूम डेट प्लॅन करा.