Anushka Tapshalkar
या चित्रपटातील राज सिमरनची लव्ह स्टोरी अजूनही सगळ्यांच्या आवडीची आहे. या चित्रपटाने प्रेमाची एक वेगळी व्याख्या मांडली आणि त्यातील डायलॉग आणि रोमँटिक सीन्स आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.
प्रेम आणि दुःख यांचे उत्तम एकत्रीकरण या चित्रपटात पाहायला मिळते. प्रेक्षकांना ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या लव्ह स्टोरी मधला त्याग, संघर्ष आणि दुःख फार आवडले होते.
या चित्रपटात प्रेम आणि परंपरा यात होणारा वाद दाखवला आहे. परंपरेपेक्षा प्रेमाला दिलं गेलेलं महत्त्व, त्यामुळे येणाऱ्या अडचणी, मनात निर्माण होणाऱ्या भावना आणि चित्रपटातली गाणी सगळ्यांना आवडण्यासारखी आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन शत्रू देशांमधील प्रेम आणि त्याला समोर आलेल्या अडचणी यावर आधारित हा चित्रपट प्रेमाची ताकद प्रदर्शित करतो.
मनाला आनंद देणारा आणि मजेदार असा हा चित्रपट तुमच्या पार्टनर सोबत नक्की बघावा असा आहे. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांची उत्तम केमिस्ट्री यात पाहायला मिळते.
या चित्रपटात दोन वेगवेगळ्या काळातील लव्ह स्टोरी दाखवण्यात आल्या आहेत. त्यातल्या पात्रांच्या विचारांमधून प्रेमाचं बदललेलं रूप आणि आजच्या पिढीच्या प्रेमाच्या अपेक्षांचं साधं चित्रण करण्यात आलं आहे.
हा चित्रपट एक इंटेन्स लव्ह स्टोरी आहे. चित्रपटातल्या गाण्यांच्या मार्फत प्रेम, वेदना, आणि हळवेपणा याचा सुंदर मिलाफ दाखवला आहे. रणबीर कपूरच्या अभिनयाने या कथेल अजूनच दुजोरा मिळालं आहे.
हा चित्रपट एकतर्फी प्रेमावर आधारित आहे. धनुषने या चित्रपटात जी भूमिका केली आहे, त्यात त्याच्या प्रेमाच्या भावना आणि त्यागाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.
हा चित्रपट एक सुंदर आणि व्हिंटेज लव्ह स्टोरी आहे. रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या भावनिक अभिनयातून प्रेम खूप नाजूकपणे व्यक्त केलं आहे.
हा चित्रपट मैत्री आणि प्रेमाचं एक छान मिश्रण आहे. रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांचा अभिनय आपल्याला स्वतःला ओळखण्याचा, प्रवास करण्याचा आणि प्रेमाचा आनंद मिळवण्याचा अनुभव देतो. या चित्रपटाने प्रेम आणि जीवनाच्या खऱ्या मुल्यांबद्दल चांगलं शिकवलं आहे.