Aarti Badade
चिया बिया वजन कमी करण्यासाठी तर उपयुक्त आहेतच, पण त्या त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
चिया बिया त्वचेला आतून डिटॉक्स करतात व मुक्त रॅडिकल्सशी लढतात.
त्यामधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड त्वचेची ओलावा टिकवतात. एलोवेरा जेलसोबत वापरल्यास आणखी फायदेशीर.
चिया बियांमधील झिंक मुरुमे कमी करतो आणि त्वचेला स्वच्छ ठेवतो.
स्मूदी, सॅलड, दही किंवा पाण्यात भिजवून चिया बिया खाल्ल्यास शरीर स्वच्छ होते आणि त्वचा उजळते.
फायबर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम त्वचेला निरोगी ठेवतात. चिया मास्क त्वचेला थंडावा व आराम देतो.
चिया बिया त्वचेवरील सूज कमी करून तिला शांत करतात आणि वृद्धत्व रोखतात.
भिजवलेल्या चिया बियांपासून नैसर्गिक स्क्रब तयार करा. हे त्वचा स्वच्छ व चमकदार बनवते.
सौंदर्य हे केमिकल्समध्ये नाही, तर घरच्या नैसर्गिक गोष्टींमध्ये आहे. चिया बिया हे त्याचं उत्तम उदाहरण!