Aarti Badade
आजकाल सोशल मीडिया आणि यूट्यूबवर निरोगी राहण्यासाठी अनेक टिप्स मिळतात. पण, जास्त प्रयत्न न करता तुम्हाला निरोगी राहायचे असेल, तर लिंबू घालून भेंडीचे पाणी पिणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
भेंडीमध्ये असलेले फायबर तुमचे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते, तर लिंबू पाचक एंजाइम (digestive enzymes) सक्रिय करते. यामुळे तुमची पचनक्रिया लक्षणीयरित्या सुधारते.
भेंडी खाल्ल्याने तुम्हाला बराच काळ पोट भरलेले जाणवते, ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते. यासोबतच, लिंबू तुमच्या चयापचय क्रिया (metabolism) वाढवते, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
भेंडी रक्तातील साखरेचे शोषण कमी करते, तर लिंबू इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते. मधुमेहाचा धोका असलेल्या किंवा मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे.
भेंडी आणि लिंबू दोन्ही शरीरातील अशुद्धी बाहेर काढण्यास आणि शरीराला डिटॉक्सिफाय (detoxify) करण्यास मदत करतात. यामुळे तुमचे शरीर आतून स्वच्छ आणि निरोगी राहते.
लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि भेंडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात. नियमित सेवनाने त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
भेंडीतील फायबर सोडियम कमी करते आणि लिंबू शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करते, ज्यामुळे जळजळ (inflammation) कमी होते.
भेंडीचा चिकटपणा घशाला आराम देतो आणि लिंबू शरीराचा पीएच (pH) संतुलित करतो, ज्यामुळे घसा खवखवण्यावर फायदा होतो.