कसा झाला नागपूरच्या झणझणीत सावजी मटणाचा जन्म, जाणून घ्या इतिहास

Aarti Badade

सावजी मटण म्हणजे काय?

सावजी मटण हे नागपूरचं खास आणि झणझणीत पारंपरिक खाद्यपदार्थ आहे, ज्याची काळी तर्री सर्वाधिक प्रसिद्ध आहे.

History of Saoji Mutton Curry in Maharashtra | Sakal

कोष्टी बांधवांचा इतिहास

मध्य प्रदेशातील हलबा कोष्टी समाज नागपूरातील मिल्समध्ये कामासाठी आला आणि त्यांनीच सावजी मटणाची सुरूवात केली.

History of Saoji Mutton Curry in Maharashtra | Sakal

सुट्टीतला मटण मेळा

सुट्टीच्या दिवशी एकत्र जेवताना खास मटण बनवण्याच्या स्पर्धांमधून सावजी मटणाचा जन्म झाला, असं सांगितलं जातं.

History of Saoji Mutton Curry in Maharashtra | Sakal

मिल्स बंद, खानावळी सुरू

मिल्स बंद झाल्यानंतर कोष्टी बांधवांनी घरच्या घरी खानावळ सुरू केल्या आणि सावजी मटण नागपूरभर प्रसिद्ध झालं.

History of Saoji Mutton Curry in Maharashtra | Sakal

पहिलं सावजी हॉटेल

गोळीबार चौकात सुरू झालेलं पहिलं सावजी हॉटेल नागपूरकरांच्या जिभेवर अधिराज्य गाजवायला लागलं.

खास मसाले आणि काळी तर्री

सावजी मटणात वापरले जाणारे खास मसाले आणि त्याची काळसर तिखट तर्री हे या मटणाचे खरे वैशिष्ट्य.

History of Saoji Mutton Curry in Maharashtra | Sakal

तर्री पोहे

सावजी तर्री इतकी प्रसिद्ध झाली की लोक ती नाश्त्यातसुद्धा पोह्यांसोबत खाऊ लागले – "तर्री पोहे" म्हणून.

History of Saoji Mutton Curry in Maharashtra | Sakal

सावजी मसाल्यांची खासियत

सावजी मसाले हे कोष्टी समाजाचे खास ट्रेडिशन आहेत. हे घरगुती पद्धतीने बनवले जातात आणि मटणाला झणझणीत चव देतात.

History of Saoji Mutton Curry in Maharashtra | Sakal

घराघरात सावजी स्टाइल

सावजी मटण फक्त हॉटेलपुरतं नाही, तर नागपूरमध्ये अनेक घरांमध्ये खास प्रसंगी सावजी स्टाइल मटण बनवलं जातं.

History of Saoji Mutton Curry in Maharashtra | Sakal

चक्क महाराष्ट्रात लागलाय जीन्सचा शोध?

Dungaree Jeans history | sakal
येथे क्लिक करा