टॉपर प्राचीने शेअर केला तिचा सक्सेस मंत्रा

Monika Lonkar –Kumbhar

उत्तर प्रदेशमध्ये नुकतेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागले.

यंदा UPMSP 10 वीमध्ये एकूण 89.55 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्राची निगम

१० च्या परीक्षेत उत्तर प्रदेशातील सीतापूरची प्राची निगम संपूर्ण राज्यात अव्वल आली आहे. विशेष म्हणजे प्राचीला ६०० पैकी ५९१ गुण मिळाले असून तिची उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.५० टक्के आहे.

टॉपर असलेल्या प्राचीने नुकताच तिचा सक्सेस मंत्रा विद्यार्थ्यांसाठी शेअर केला आहे.

उजळणी महत्वाची

प्राचीने सांगितले की, कोणत्याही परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी रिव्हिजन अर्थात उजळणी खूप महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत तुम्ही जे काही वाचत आहात, त्याची नक्की उजळणी करा.

शिक्षकांचा सल्ला मोलाचा

अभ्यासादरम्यान तुमच्या शिक्षकांनी दिलेल्या सल्ल्याचे अवश्य पालन करा. प्राची म्हणाली की, शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम करतात, त्यांच्या मदतीने आपण परीक्षेची चांगली तयारी करू शकतो.

तणावाला करा टाटा-बायबाय

प्राचीने सांगितले की, जर तुम्ही नियमितपणे कोणताही ताण-तणाव न घेता अभ्यास केला तर तुम्हाला यश नक्कीच मिळते.

उन्हाळ्यात वजन कमी करायचय? मग, आहारात या फळांचा करा समावेश

Weight loss Tips | esakal