संकष्टी स्पेशल! साबुदाणा-बटाट्यापासून कुरकुरीत उपवासाचे आप्पे अन् शेंगदाणा चटणी

Aarti Badade

संकष्टी चतुर्थीचा फराळ

उपवासाला नेहमीची साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, तर यंदा भगरीचे पौष्टिक 'आप्पे' आणि खमंग 'शेंगदाणा चटणी' नक्की ट्राय करा.

Upwas Appe Recipe

|

Sakal

आप्पे बनवण्यासाठी साहित्य

यासाठी तुम्हाला १ कप भगर (वरई), १ कप भिजवलेला साबुदाणा, दही, उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, शेंगदाणा कूट आणि सैंधव मीठ लागेल.

Upwas Appe Recipe

|

Sakal

पीठाची पूर्वतयारी

भगर आणि भिजवलेला साबुदाणा एकत्र करून त्यात दही आणि मीठ घाला. हे मिश्रण डोशाच्या पिठाप्रमाणे सरसरीत पण थोडे घट्ट वाटून घ्या.

Upwas Appe Recipe

|

Sakal

बटाट्याचे चटपटीत सारण

उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यात हिरवी मिरची, जिरे, शेंगदाणा कूट आणि मीठ घालून छोटे गोळे तयार करा. हे सारण आप्प्यांची चव वाढवते.

Upwas Appe Recipe

|

Sakal

आप्पे शिजवण्याची पद्धत

आप्पेपात्रात तूप लावून थोडे पीठ ओता, त्यात बटाट्याचे सारण ठेवा आणि वरून पुन्हा पीठ घालून झाकण ठेवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत आप्पे भाजून घ्या.

Upwas Appe Recipe

|

Sakal

खमंग शेंगदाणा चटणी

चटणीसाठी भाजलेले शेंगदाणे, ओले खोबरे, हिरवी मिरची, दही आणि मीठ एकत्र करून मिक्सरला वाटून घ्या. हवी असल्यास जिऱ्याची फोडणी द्या.

Upwas Appe Recipe

|

Sakal

चवीत वाढ करणाऱ्या टिप्स

जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि कढीपत्ता खात असाल, तर त्याचा वापर नक्की करा; यामुळे आप्पे अधिक सुवासिक आणि चविष्ट होतात.

Upwas Appe Recipe

|

Sakal

गरमागरम आस्वाद घ्या!

बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे 'उपवास आप्पे' शेंगदाणा चटणीसोबत सर्व्ह करा. संकष्टी चतुर्थीचा तुमचा उपवास होईल एकदम खास!

Upwas Appe Recipe

|

sakal

उपवास स्पेशल स्नॅक्स... बाहेरून क्रिस्पी, आतून मऊ रताळ्याचे काप

Vrat Special Recipe Ratale Kap 

|

sakal

येथे क्लिक करा